पुणे : पुण्यातील कसबा पेठ परिसरात युवा सेनेचा पदाधिकारी दीपक विजय मारटकर (वय 36) याचा अज्ञात मारेकर्यांनी चाकूने आणि कोयत्याने वार करून खून केला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. परत एकदा या परिसरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.मयत हा शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा होता. विजय मानकर यांचा मृत्यू एका महिन्यापूर्वी कोरोना मुळे झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गवळी अळी शुक्रवारपेठ हा खून झाला.
रात्री जेवण करून दीपक फिरण्यासाठी बाहेर आले होते. दबा धरून बसलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी मारटकर यांच्यावर धारदार शस्त्राने छातीवर सपासप वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या मारटकर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पहाटे दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या मारेकर्यांनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी चेहऱ्याला मास्क लावले होते.तसेच खून केल्यानंतर हे सर्व आरोपी मोटरसायकलवरून पळून गेल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.