विज बिलांचा गोंधळ, बिलातील चुका आणि वाढीव बिलांसदर्भात पद्मावती विज वितरण कार्यालयातील आधिकाऱ्यांची भेट,
पुणे : पद्मावती महावितरण कार्यालयातील विज बिलांचा गोंधळ कायम असून वाढीव बिल आणि बिलातील चुका दुरुस्तीसाठी महावितरणाकडे ग्राहकांच्या चकरा वाढल्या आहेत. लाँकडाऊनच्या काळात एकत्रित बिले पाठवून अगोदरच शाँक दिलेल्या महावितरण कार्यालयाने पुन्हा एकदा वाढीव बिले पाठविल्याने बिल कमी करण्यासाठी पद्मावती वीज वितरण कार्यालयात गेलेल्या नागरिकांना आधिकाऱ्यांकडून उद्धटपणाची उत्तरे मिळाली.
आधिकाऱ्यांची ताठर भूमिका आणि कोरोनाच्या संकटामुळे कात्रीत सापडलेल्या आण्णा भाऊ साठे वसाहतीमधील महिलांनी शेवटी प्रभागाचा सेवक म्हणून माझ्या कडे दाव घेतली. यावेळी मी महिलांसमवेत आधिकाऱ्यांची भेट देऊन ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करावे, वेळेत व अचूक रिडींग घेऊन बिले द्यावीत व जास्तीच्या बिलास सवलत द्यावी अशी आग्रही मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.