पुणे : पुण्यात विकसित करण्यात आलेल्या कोरोना किलर या उपकरणास पहिल्यांदाच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी ने मान्यता दिली आहे. कोरोना किलर
हा उपकरण मानवी शरीरा बाहेरील कुठे ही असलेला कोरोना वायरस तसेच इतर धोकादायक वायरस अवघ्या काही मिनिटात किल करू शकते. हे आय सी एम आर आणि एन आय वी च्या चाचणीत सिद्ध झालं आहे.
पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन प्रायवेट लिमिटेड या कंपनीने हा उपकरण विकसित केला आहे.
वातावरणातील नैसर्गिक हवेला हाय इलेक्ट्रीसिटी वर आयनोजेशन प्रोसेस करून हा उपकरण कोरोना वायरस किल करतो, हे आय सी एम आर आणि एन आय वी च्या चाचणीत सिद्ध झालं आहे. घरात, दुकानात, चाारचाकी वाहनात, मॉल, सिनेमागृहात, हॉस्पिटल, हॉटेल, रेस्टॉरंट, रेल्वे बोगी आणि वेगवेगळ्या खाजगी आणि सरकारी कार्यालयात ही मशीन सहज वापरता येते. अस इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन प्रायवेट लिमिटेड कंपनीचे संचालक भाऊसाहेब जजिरे यांनी सांगितलं
Byte : भाऊसाहेब जजिरे ( डायरेक्टर इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन प्रायवेट लिमिटेड )