पुणे : जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून जबरी चोरी करणारा आरोपी LCB पुणे ग्रामीण कडून जेरबंद. फिर्यादी रमेश गोरख देशमुख हे कारेगाव गावच्या हद्दीत कल्याणी कंपनी जवळून पायी जात असताना एक बिगर नंबर प्लेटच्या मोटरसायकल वरील दोन ज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हिसकावून जबरी चोरी करून चोरून नेले बाबत रांजणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 257/2020 भा द वी कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करणेकामी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख तसेच मा.अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिला होता. त्यानुसार पो. नि. पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक राम धोंडगे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर,पोलीस नाईक जनार्दन शेळके,पोलीस नाईक मोहम्मद अंजर मोमीन यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना
त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमी द्वारे आज दिनांक 28 सप्टेंबर 2020 रोजी वरील स्टाफसह आमदाबाद फाटा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे सापळा रचून आरोपी नामे वैभव नारायण पवार वय 25 रा. आमदाबाद फाटा मलठण रोड, आमदाबाद तालुका शिरूर जिल्हा पुणे यास शिताफिने पकडून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करता त्याचे जवळ चोरीला गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली हिरो एक्स्ट्रीम मोटर सायकल नंबर नसलेली मिळून आली.
सदरचा गुन्हा हा आरोपीने त्याचा साथीदार विधिसंघर्षग्रस्त बालक नामे भैया उर्फ आशिष दशरथ गायकवाड राहणार मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे याचे सह मिळून केला असल्याची सांगितले आहे.
पकडण्यात आलेल्या आरोपीला गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व त्यात वापरलेल्या मोटरसायकल सह रांजणगाव पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाही करता हजर करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दिलीप शिंदे रांजणगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

