पुणे : गुन्हेगारी आणि पोलिस दलाच्या जीवनपद्धतीचे सर्वांनाच आकर्षण असते. यात अनुभवांचे
प्रभावी शब्दात लिखाण महाराष्ट्र राज्याचे कारागृह अपर पोलिस महासंचालक  सुनिल रामनंद यांनी केले आहे. त्यांच्या विशिष्ट शैलीमुळे हे पुस्तक वाचकांना भावेल यात  शंकाच  नाही. जीवनात आलेल्या अनुभवावर या पुस्तकाचा गाभा रचला आहे.  


“कॉप्स इन एक क्वाॕगमायर” अर्थात ‘ दलदलीत फसलेला पोलिस या प्रसिद्ध कादंबरीचे उद्घाटन पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  पुस्तक सोहळ्यास बिनतारी सदेश विभागाचे संचालक  रितेशकुमार  पुण्याचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, संजय शिंदे,कारागृहाचे योगेश देसाई,पोलिस उपायुक्त संभाजी कदम उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजीराव पवार यानी केले.


रामनंद हे भारातीय पोलिस प्रशासन  दलातील अत्यंत कडक शिस्तीचे आधिकारी म्हणून ओळखले जातात. आणि त्यानी लिहलेली कांदबरी नक्कीच समाजाला आणि पोलिस दलाला प्रेरणा देणारी ठरेल अशा भावना गुप्ता यानी प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केल्या.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »