
पुणे : सर्व शहरात सोशल डिस्टंसिंग राखण्याची जबाबदारी ही पोलिसांवरआहे .मात्र आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने हे कर्मचारी नाराजीचा सूर घेऊन पोलीस आयुक्तांना भेटायला गर्दी करत असल्याचे निष्पन्न झाले. एकूण चारशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या सर्व बादल्या पूर्व पोलीस आयुक्तांनी केल्या.
1289 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या दोन महिनापूर्वी झाल्या आहेत . सहा वर्ष एका ठिकाणी नोकरी केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. यातच काही बदल या कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून केल्या जातात. तर काही कामात दिरंगाई केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अशा प्रकारे बदल्या केल्या जातात. या सर्व बदल्या पूर्व आयुक्तांनी केल्या आहेत.
परंतु यामध्ये काही कर्मचार्यांच्या बदल्या वेळेआधीच झालयाचे त्यांचे बोलणे आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा सूर उमटत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज शंभर पोलिसांनी सकाळी नवीन पोलीस आयुक्तांना भेटून समस्या सांगितली. आणि अनेकांनी तर पोलीस आयुक्तांना साकडे घातले की या बदल्या रद्द करून त्यांच्यावरील अन्याय दूर करावा. प्रकार समजून घेऊन नवीन पोलीस आयुक्त काय निर्णय घेतील याकडे मात्र या सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.