संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण
मुबंई : महाराष्ट्रातील राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. अशातच अचानक संजय राऊत आणि फडणवीस यांच्यात हॉटेल ग्रँड हयात मधिल दोन तास चाललेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
या भेटीने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण भाजपा आणि शिवसेनेमध्ये रोटीबेटीचे व्यवहार कधीच बंद होऊन ते एकमेकांचे शत्रू पक्ष म्हणूनच वावरताना दिसतात. अशात देवेंद्र फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची भेट दुपारी दीड वाजता हॉटेल ग्रँड ह्यात मध्ये बेथक सुरू झाली. आणि साडेतीन ला संपली. या भेटीची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. राजकीय वर्तुळात, राजकीय मंडळी या भेटीचा वेगवेगळा अर्थ लावू लागले. या भेटीमुळे येणाऱ्या काळात जुने समीकरण नव्याने परत एकदा बघायला मिळू शकेल का अशा शंका देखील व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राचा विचार करता आपण सध्या पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आहे. परंतु वेळोवेळी या तिन्ही पक्षांचे मतभेत चव्हाट्यावर येतात. यामुळे सत्ताधारी पक्ष पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकेल हा देखील प्रश्न अनेकवेळा उपस्थित केल्या जातो.
मुंबईमध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रनौत प्रकरण तसेच हिंदी सिनेसृष्टीचे ड्रग्स कनेक्शन यामुळे प्रत्येक वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर निशाणा साधत असतात. अशी परिस्थिती असतानादेखील हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन दोन तास चर्चा करतात हे पचनी पडत नाही. याने परत एकदा जुने समीकरण नव्याने बघायला मिळते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे.
या भेटीबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीबद्दल मला माहीत नाही. आणि अशा भेटी होत असतात,यात काही गैर नाही. प्रत्येकच बाबतीत राजकारण असलेच पाहिजे असेही काही नाही, अशी स्पष्ट भूमिका पाटील यांनी मांडली. चंद्रकांत पाटील यांच्याकडे अत्यंत महत्वाचं पद आहे. त्यांना भाजपातील सर्वच घडामोडी माहिती असतात.परंतु दादा वेळ वेळ मारून नेन्यात आणि भाजपाची प्रतिमा सांभाळण्याचा कायमच अग्रेसर असतात. यासाठीच यावेळीही या बद्दल बोलताना काळजीपूर्वक त्यांनी सांगितले की या भेटीबद्दल मला काहीच माहित नाही.