लॉकडाऊनमध्ये पोलिसांना मिळाला नवा साथीदार…!

पुणे : पोलिसांची खाकीवर्दी म्हटली कायमच व्यक्तींच्या मनात भीती निर्माण होते. परंतु विश्रांतवाडी पोलिसांनी लॉकडाऊन मध्येही एका आजारी कुत्र्यावर उपचार करून भूतदया दाखवली आहे. कोरोना लॉक डाऊनमध्ये अतिशय व्यस्त पोलीसांची दिनचर्या असतानादेखील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी आजारी कुत्र्यावर उपचार सेवा,सुशृषा करून ,पोलीस व्यक्तींचे  नाहीतर प्राणिमात्रांचे देखील संरक्षण करतात असा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमध्ये लॉकडाऊच्या काळात बिबवेवाडीचे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे आणि सहकारी पेट्रोलींग करत असताना अनेक दिवासापासून आजारी असलेला कुत्रा दिसला.
घाडगे यांनी भूतदया दाखवित त्या कुत्र्याला औषधोपचार करुन पोलिस स्टेशनला आणले. गेल्या चार महीन्यापासून हा कुत्रा पोलिसासमवेत पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहतोय शिवाय रात्री पोट्रोलिंग देखील करतोय. पोलिस स्टेशनच्या आवारात कोणी मोठ्या आवाजात बोलत असेल तर त्यांच्यावर भुंकतो. पोलिसमित्र बनलेल्या या अनोख्या कुत्र्याची बिबवेवाडी परीसरात एकच चर्चा रंगलीय.

पोलिसांच्या कोंबींग अॉपरेशनमध्ये आरोपीचा शोध घेताना आरोपी जर पळत असेल तर त्याचा पाठलाग करुन त्याला जेरीस आणतो. लॉकडाऊन काळात पोलिसांनी याला लळा लावला त्याला औषधोपचार अन् खाऊ घातले. त्यानंतर त्या उपकाराची परतफेड म्हणून की काय पोलिसांना अहोरात्र मदत करणाऱ्या या अनोख्या पोलिसमित्र कुत्र्याची चर्चा अन् कौतुक केलं जातयं.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »