जम्बो कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्टरच सुरक्षित नसतील तर इतर महिलाच्या महिला रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला.

पुणे : शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटर हे  उपचाराचे जम्बो सेंटर नसून आता समस्यांचे जम्बो सेंटर बनल्याचे निदर्शनास येत आहे. या जम्बो सेंटरमध्ये  एका 25 वर्षीय महिला डॉक्टर कडे तिच्या सहकारी दोन डॉक्टरांनी  अश्लील भाषेत शरीरसुखाची मागणी करीत डॉक्टर व्यवसायाला काळिमा फासलयाची घटना घडली. सदर महिलेने कंटाळून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे संबंधित दोन डॉक्टरां वरती गुन्हा दाखल केला.

जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचे होणारे हाल,  ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू , काही दिवसांपूर्वी तर उपचार घेणारी एक महिलाच जम्बो सेंटर  मधून गायब झाली होती. शनिवारी ती सापडली. आता अशातच हा महिला डॉक्टरचा विनयभंग या सर्व घटनांनी शिवाजीनगर येथील जम्बो सेंटर चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेने जम्बो सेंटर मधील  कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे .


शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये डॉ. योगेश भानुशाला भद्रा, डॉ. अजय बागलकोट या दोन डॉक्‍टरांवर  गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला डॉक्टर ही देखील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये डॉ. अजय आणि डॉ. योगेश यांच्या सोबतच काम करीत होती.
कामाच्या निमित्ताने एकत्र असल्याने हे दोन्ही डॉक्टर  महिला डॉक्टरला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करीत होते. तसेच या महिला डॉक्टर कडे सातत्याने शरीरसुखाची मागणी करत होते. 

महिला डॉक्टरने कंटाळून प्रशासनाकडे देखील तक्रार नोंदवली होती. प्रशासनाने मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही.  उलट या दोन्ही आरोपींनी महिला डॉक्टरचा अधिकच छळ सुरू केला. तक्रार केल्यामुळे हे दोन्ही डॉक्टर आता तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची  मागणी करत होते.  आमचे ऐकले नाही तर आम्हाला सर्व काही  करता येते अशी धमकीही त्या महिलेला देत होते.

महिला डॉक्टर  सतत होणारा विनयभंग यामुळे   कंटाळली होती. शेवटी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला या दोन्ही डॉक्टरांविरोधात  तक्रार दाखल केली. संपूर्ण घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे या करीत आहे.  हे तीनही डॉक्टर एका खाजगी कंपनीच्या वतीने शिवाजीनगर येथील जम्बो सेंटरमध्ये काम करतात. या महिलेच्या तक्रारीची दखल प्रशासनाने गांभीर्याने का घेतली नाही याचा देखील तपास पोलिस करणार आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »