बारामती : बारामतीत ३१२ किलो गांज्यासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त. या कारवाईत आतापर्यंत एकूण ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात तब्बल ४७ लाखांचा ३१२ किलो जप्त करण्यात पोलीसना यश मिळाले. हा गांजा आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून विक्रीसाठी महाराष्ट्रात आला. सातारा आणि सांगली येथे बारामती मार्गे हा गांजा विक्रीसाठी जाणार आहे.. अशी माहिती पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप मिळाली होती. त्यानंतर सापळा प्रसून गांजा पकडण्यात आला. अशी माहिती द पब्लिक वोईस न्यूजला पोलिस उप-अधीक्षक नारायण शिरगावकर यांनी दिली.