पुणे : जिल्हयातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे, तसेच पाटबंधारे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नीरा डावा कालव्यावरील वितरण प्रणालीचे विशेष दुरुस्ती प्रस्ताव तसेच शेटफळ तलाव धरण व कालव्याच्या कामाचे प्रस्ताव निधीसाठी राज्य शासनाकडे सादर करावेत. नीरा डावा मुख्य कालव्यातून होणारी पाणीगळती थांबविण्यासाठी या कालव्याच्या अस्तरीकरण व दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव तातडीने सादर करा.

नीरा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या जीर्ण झालेल्या दगडी बांधकामांचे काँक्रेटीकरण करुन बांधकामे मजबूत करावीत, असे सांगून इंदापूर तालुक्यातील जुन्या शासकीय इमारती, कार्यालये व विश्रांतीगृहाच्या इमारतीच्या दुरुस्तीची कामेही हाती घ्यावीत, अशा सूचना करुन मुळशी धरण प्रकल्पातून नागरिकांना शेती, आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्यासाठी तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबविण्यासाठी सुर्वे समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळवून देण्यासाठी अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. भागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी पाटबंधारे विभागातील कामांच्या प्रश्नांबाबत तसेच विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »