१८ गावठी बनावटीचे पिस्टल आणि २७ जिवंत काडतुस हडपसर पोलिसांनी जप्त केले आहेत…या प्रकरणी हडपसर पोलीसांनी ६ आरोपींना अटक केली आहे. यात मुख्य आरोपी हा अरबाज खान,आहे या कारवाईत ५ लाख ६८ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपीकडून जप्त करण्यात आलेले गावठी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसे यामुळे पुणे शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याचे कारस्थान घडले असते.मात्र ते आता होणार नाही.यामुळे अजून या आरोपीकडून अनेक माहिती मिळण्याची शक्यता आहे.यातील अनेक आरोपीवर अगोदरही गुन्हे दाखल आहेत.आरोपींनी एवढा मोठा शस्त्रसाठा कशाला आणला होता? कोणाला दिला जाणार होता? की काही घात पात करायचा होता याचा तपास हडपसर पोलीस करत पुणे शहर परिसरातील ही मोठी कारवाई आहे ज्यात शस्त्र साठा पकडण्यात आले आहे बाईट -सुहास बावचे पोलीस उपायुक्त परिमंडळ 5