धनगर बांधवाला जमावाकडून अमानुष_मारहाण…
सत्ता आणि संपत्ती’ची नशा आहे म्हणून गरिबाला कुटुंबा समोर मारहाण करता, हाच तुमचा पुरुषार्थ आहे का…?

पुणे : दि. २३ सप्टेंबर २०२० रोजी सोनपिरवाडी ता. बारामती जि. पुणे येथे श्री. भिवा ठोंबरे, शंकर देवकाते, सुखदेव देवकाते, दादा कोकरे या हल्ला केला. सत्तेची मस्ती असणारे जर गरिबांवर हल्ला करायला लागले तर गरीब माणूस सुरक्षित नाही हे महाराष्ट्राचे चित्र आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात बहुजन समाजातील गरीब कुटुंबावर जर हल्ले होत असतील काही दुर्दैवी आहे पोटापाण्यासाठी ऋतू जसा बदलतो तसा तो वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरत असतो त्यामुळे त्यांच्यावर होणारे वारंवार होणारे हल्ले यावर राज्य सरकारने काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे पन्नास लोकांच्या झुंडी विरोधात पीडित कुटुंब सुपा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असताना त्यांची तक्रार सुद्धा घेतलेली नाही राज्यसरकारने हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे


शरद पवार साहेब, अजित पवार, सुप्रियाताई सुळे, रोहित पवार, कांचनताई कुल… तुमच्या मतदारसंघात, तुमच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात माणसांवर बायका पोरांवर हल्ले होत आहेत लक्ष द्या आणि ह्या गुंडांवर गुन्हे दाखल करा… आणि गुन्हा दाखल झालाच पाहिजे.
जनावरे चारताना हातामध्ये काठी – कुऱ्हाड असते ती रानटी जनावरे आवरायला… आम्ही माणसावर वापरत नाही… (आमची चाकरी करण्यात आयुष्य गेले, भाकरी चोरण्यात नाही.)
ज्यांनी दादागिरी करून गुंड सारख्या गरीब कुटुंबाला मारहाण केली, जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडची आहे.
संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने आज पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देशमुख साहेब व पोलिस अधीक्षक देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे प्रकरण प्रकरण गंभीर असून गुन्हेगारांवर कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेड निवडा आंदोलन करणार आहे.
यावेळी निवेदन देताना… संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, संतोष शिंदे, महादेव मातेरे, गणेश सराटे, शिवाजी पवार, अमोल बोरूडे, निलेश ढगे आदी उपस्थित होते.