विजेत्यास मिळणार रुपये 50 हजाराचे बक्षीस

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 ची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याकरीता पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासनाचे वतीने मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या असून यामध्ये राज्य स्तरावर राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे.
राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष तर्फे ग्रामिण पाणी व स्वच्छता योजनांचे अनुषंगाने बोधचिन्ह व बोध वाक्य तयार करण्यात येणार आहे. यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासनाचे वतीने राज्यात बोधचिन्ह व बोध वाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.


बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धेत पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी (नागरिक/संस्था, जाहीरात कंपनी ) सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आयुष प्रसाद, यांनी केले.

स्पर्धेची सर्व साधारण नियमावली
• लोगो ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामिण स्वच्छता या विषयाचा सहज बोध होईल असा असावा.
• ब्रिदवाक्य मराठीतूनच असणे बंधनकारक असेल.
• ब्रिदवाक्य मोजक्या शब्द मर्यादेत असावे.
• स्पर्धेत व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था सहभागी होऊ शकतील.
• बोधचिन्ह (Logo), रंगीन प्रकारात असावा.
• सहभागींनी लोगोची Soft Copy पाठविणे आवश्यक असेल त्यासोबत स्पर्धकाची संपूर्ण माहिती उदा. पत्ता, इमेल आय.डी. संपर्क क्रमांक इ. असणे आवश्यक आहे.
• ज्या स्पर्धकाचा लोगो अंतिम निवड होईल त्यांनी CDR (Coral Draw) फाईल्स जिल्हा व राज्य शासनास उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.


• विभागाच्या राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष directorwsso@gmail.com आणि iecwsso@gmail.com व nbazppune@gmail.com या मेल आयडी वर पाठविण्यात यावी.
• स्पर्धकांतून अंतिम निवड करण्याचे संपूर्ण अधिकार राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाला आहे.
• बोधचिन्ह आणि बोधवाक्य अंतिम निवड होणा-या विजेत्यास र. रुपये 50 हजार बक्षीस स्वरुपात देण्यात येईल.
• दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वा. पर्यंत सर्व स्पर्धकांनी मेल आयडी वर पाठवावयाचे आहे.
• दिलेले मुदतीनंतर आलेले स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »