दरोडा टाकून लुटमार करणारी टोळी पुणे ग्रामीण एलसीबी जाळ्यात.

पुणे :  पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.) पथकाने चौफुला मोरगाव रोडवर दरोडा टाकून ट्रक लुटणारी टोळी जेरबंद केली.  ट्रक, त्यातील कपडयाचे धाग्याचे बंडल, प्लास्टीकचे रोल असा सुमारे १७ लाखाचा माल जप्त केल्याची माहिती  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

१३ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ०१.३५ वाजण्याचे सुमारास केडगाव चौफुला ते मोरगाव रोडवर पडवी, ता.दौंड, जि.पुणे गावचे हद्दीत ओढयाजवळ अज्ञात चोरटयांनी, कारमध्ये व मोटरसायकलवर येवून ट्रक ड्रायव्हर रफिकउद्दीन अब्दुल शकुर खान, रा.सिंधीभोडीया, ता.पितमपुर, जि.धार, मध्यप्रदेश हे चालवित असणारे अशोक लेलँड ट्रकला काळे रंगाची इंडिगो कार आडवी मारून कोयत्याचा धाक दाखवून ट्रक नं.एम.एच. १० सी.आर.४१४९ व त्यामध्ये असणारा कपडयाचे धाग्याचे १४६ बंडल, प्लास्टीकचे १२ रोल, ड्रायव्हर व क्लीनर यांचेकडील रोख रक्कम रू.४,०००/- असा एकूण किं.रू.१९,०७,०८४/- किंमतीचा माल दरोडा टाकून चोरी करून ट्रकचा ताबा घेवून ड्रायव्हर व क्लीनरला पडवी येथून चौफुला मार्गे पाटस जवळ पुसेगाव घाटात दमदाटी करून निर्जनस्थळी सोडून दिले व ट्रक मालासह घेवून पळून गेले. त्याबाबत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर दरोडयाचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करणेकामी मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.मनोज लोहिया यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे प्रभारी पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सचिन गायकवाड, महेश गायकवाड, निलेश कदम, दत्तात्रय तांबे, सुभाष राऊत, गुरूनाथ गायकवाड, चंद्रकांत झेंडे, प्रकाश वाघमारे, राजेंद्र चंदनशिव, गणेश महाडीक, प्रमोद नवले, अक्षय जावळे यांचे पथक नियुक्त केले हेाते.

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, गुन्हयातील गेलेला माल अशोक लेलँड ट्रक नं. १० सी.आर.४१४९ हा सासवड ते नारायणपुर रोडवर उभा असून त्यामध्येे चार इसम असून ते ट्रकमधील माल विक्रीसाठी गिऱ्हाईक शोधत आहेत अशी माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जावून मौजे भिवडी गावचे हद्दीत सदर वर्णनाचे ट्रकचे नंबर प्लेटला  चिखल लावल्याचे दिसून आल्याने त्या ठिकाणी पथकाने साध्या वेशात सापळा रचून ४ इसम संशयास्पदरित्या घुटमळत असताना मिळून आल्याने त्यांना पकडताना पळून जाताना पाठलाग केला.

१)अतुल बाबुराव गजरमल वय ३० रा.महादेवनगर, हडपसर, पुणे, मुळ रा.कात्रज, जिंती, ता.करमाळा, जि.सोलापूर, २)गणेश उर्फ दादया विठ्ठल हवालदार, वय २० वर्षे, रा.महादेवनगर, अलाहाबाद बॅंकेमागे, हडपसर, पुणे ३)लक्ष्मण उर्फ पंकज धनंजय जाधव, वय २० वर्षे रा.चौरंग अपार्टमेंट, महादेवनगर,हडपसर, पुणे  ४)समीर लियाकत पठाण, वय २२ रा.गोपाळपट्टी, विशाल काॅलनी, मांजरी, पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चैकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर साथीदार ५)तेजस बाळासाहेब खळदकर, वय २३  रा.तुकाईदर्शन हडपसर, पुणे, ६) विनोद उर्फ भैया विठ्ठल आदमाने, वय २१ रा.उदय काॅलनी, महादेवनगर, मांजरी, पुणे  ७) स्नेहा उर्फ मच्छी चव्हाण रा. डवरीनगर, लोखंडीपुलाजवळ, हडपसर पुणे व दोन अल्पवयीन मुले असे एकूण ९ जणांनी मिळून  केला असल्याची कबुली दिली आहे.

गुन्हा करतेवेळी सदर आरोपींनी महीला नामे स्नेहा उर्फ मच्छी चव्हाण रा.डवरीनगर, लोखंडीपुलाजवळ, हडपसर पुणे हिचेसह इंडीगो कार व मोटरसायकलवर जावून ट्रकला कार आडवी मारून खाली उतरून ट्रक चालकास कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी केली व जबरीने माल काढून घेतला.  त्यानंतर पथकाने ६ आरोपी व २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयात गेलेला  ट्रक,  त्यातील कपडयाचे धाग्याचे ११९ बंडल, प्लास्टीकचे रोल असा सुमारे १७ लाखाचा माल जप्त केलेला आहे.

आरोपी व जप्त मुद्देमाल यवत पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाहीकरीता जमा केलेला आहे. महीला नामे स्नेहा उर्फ मच्छी चव्हाण हिचा शोध चालु आहे. अटक केलेले आरोपी यांचेविरूध्द यापुर्वी जबरी चोरी, दरोडा तयारी, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, मारहाण करणे, शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे  हडपसर, विमाननगर, शास्त्रीनगर, दौंड, भिगवण तसेच सोलापूर जिल्हयात बार्शी, करमाळा या पोलीस स्टेशनला दाखल आहेत.
सदर आरोपी हे “कोयता गँग” नावाने हडपसर परिसरात सर्वसामान्य टपरी चालक, हातगाडी पथारीवाले यांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत त्रास देवून लुटमार, महाविद्यालयीन मुलींची छेडछाड करीत होते.

त्यांना तेथील काही स्थानिक लँडमाफीया पुढा-यांचा वरदहस्त होता. त्यांच्या दहशतीने सर्वसामान्य लोक पोलीसात तक्रार देत नसायचे. सदर आरोपींवर हडपसर पोलीसांकडून तडीपारीची कारवाई चालू होती.आरोपींनी आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्यांची  दौंड कोर्टातून पोलीस कस्टडी रिमांड घेवून पुढील अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »