पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य


पुणे: महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे तिकीट काढून मेट्रोने प्रवास केला. याच दरम्यान मेट्रोच्या कामाचा आढावा देखील घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोच्या कामासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रोचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने त्यांनी प्रवास केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथून पाहणी दौ-यांला प्रारंभ केला. यावेळी अजित पवार यांनी मेट्रो चालकाच्या केबिनमधून पाहणी केली व कामकाजाचा आढावा घेतला. ब्रिजेश दीक्षित यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली. सिव्हील कोर्ट,नळस्टॉप,लकडी पूल व स्वारगेट येथील कामाचीही त्यांनी पाहणी केली तसेच आधुनिक पदधतीने बोगदा खोदकाम करणा-या नवीन मशिनचेही मेट्रोकामासाठी लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मेट्रोचे गौतम बि-हाडे, श्रीमती सरला कुलकर्णी यांनी सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »