जम्बो कोविड सेंटर येथे रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली स्थापित करून त्याचा उपयोग करण्यात येत आहे. आज माझ्या हस्ते या प्रणालीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. जम्बो सेंटरचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत.

या प्रणालीद्वारे रुग्णांच्या डिस्चार्जपर्यंतच्या सविस्तर नोंदी ठेवल्या जातात. या व्यवस्थेसाठी कमांड रुम तयार केली आहे. यापूर्वी अशी माहिती उपलब्ध होत नव्हती, त्यामुळे ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. आयसीयू आणि इतर वॉर्डमधील रुग्णांवर प्रत्यक्ष होणारे उपचार, त्यांच्या प्रकृतीची स्थिती यांची लाईव्ह माहिती येथील स्क्रीनवर डॉक्टरांना व व्यवस्थापनाला पाहता येईल. तसेच, रुग्णांचा तपशील अंतर्गत डॅशबोर्डवर अपडेट केला जाणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »