
मुंबई : पुण्यातून कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्या प्रा. ज्योती जगताप यांना कोंढव्या परिसरातून ताब्यात घेतले. सोमवारी कबीर कला मंचाचे सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना देखील एल्गार परीषद आणि भिमाकोरोगाव दंगल प्रकरणी ताब्यात घेतले. भीमा कोरेगाव या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाले. यानंतरही सोमवारी आणि मंगळवारी या दोन दिवसात NIA आणि ATS ने तिघांना अटक केली. भीमा कोरेगाव प्रकरणात आत्तापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे.

कबीर कला मंचाचे कार्यकर्ते सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांच्या म्हणण्याप्रमाणे NIA त्यांच्यावरती दबाव निर्माण करत होती की त्या दोघांनी माओवाद्यांशी संबंध असल्याचे कबूल करावे, तसेच याबाबत माफीनामा देखिल लिहून द्यावा. तरच त्यांना सोडून देण्यात येईल. अन्यथा या दोघांना अटक करण्यात येईल. आत्तापर्यंत एकूण पंधरा जणांना भीमा-कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
NIA ने आतापर्यंत एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणांमध्ये एकूण पंधरा कार्यकर्त्यांना अटक केली. सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांची अनेक दिवसांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. 2018 मध्ये झालेल्या एल्गार परिषदेतील घटनेबाबत आतापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रसिद्ध गायक तसेच जाती विरोधात काम करणारे सागर गोरखे(32) , रमेश गायचोर(38) या दोघांना भीमा कोरेगाव शौर्य दिवस कार्यक्रमासाठी आयोजित ( 31 ऑगस्ट 2017) पुण्यातील शनिवार वाडामधील एल्गार परिषदेत सहभाग असल्याने NIA ने चौकशीसाठी बोलावले होते. यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते ही कल्पना त्यांना आली होती.
एका व्हिडिओद्वारे गायचोर आणि गोरखे यांनी NIA वर आरोप लावला की भीमा कोरेगाव प्रकरणात पकडण्यात आलेल्या लोकांविरोधात देण्यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव निर्माण केला जात होता. यात या दोघांनी सांगितले की एल्गार परिषदेत संदर्भात मागील महिन्यात चौकशीसाठी मुंबईत बोलवले होते.चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. परंतु परत त्यांना चार सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले.


तसेच त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता की, त्यांचे माओवाद्यांशी असलेले संबंध कबुल करावे. तरच त्यांना सोडण्यात येईल. तसेच माफीनामा देखील लिहिण्यास सांगितला होता. परंतु त्यांनी सांगितले की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र आहोत आम्ही माफीनामा लिहिणार नाहीत.आम्ही काही चुकीचे केले नाही.
एल्गार परिषद साठी पकडण्यात आलेल्या बारा जणांविरुद्ध सुद्धा आम्ही चुकीची माहिती देणार नाही हे ही या व्हिडीओ स्पष्ट केले. हे सर्व राजकारण आहे या राजकारणातून त्यांना हे सिद्ध करायचे आहे की एल्गार परिषदेचा कार्यक्रम हा माओवाद्यांचा कार्यक्रम होता आणि हीच बाब आम्हाला वारंवार कबूल करण्यास सांगत होते.