पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने ऑटोक्लस्टर,चिंचवड येथील कोविड-१९ रुग्णालयया तसेच पुणे महानगरपालिकेचे बाणेर येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात परत एकदा चर्चेला उधाण आले.
हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने परत एकदा भविष्यात या दोघांची युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. परत एकदा सत्तेचं नवीन समीकरण पुढे येते की काय अशी शंका देखील राजकीय वर्तुळात वर्तवली उपस्थित केली जात आहे. या बाबी मुळे भविष्यात ठाकरे सरकारलाच्या देखील अडचणीत वाढ होवू शकते असे भाकित देखील वर्तवले जात आहे. परंतु याप्रसंगी अजित पवारांनी या सर्व चर्चांवर ठसकेदार शैलीत उत्तर देताना सांगितले की, देवेंद्र फडणवीस आणि मी जर एकत्र आलो तर कायम ब्रेकिंग न्यूज होते.
कोविंड सेंटरच्या उद्घाटनाला आम्ही दोघे जण एकत्र येणार म्हटलं की लगेच सर्वत्र चर्चेला सर्वत्र उधाण आले. परंतु फडणवीस यांच्यासोबत चंद्रकांत पाटील असल्याची माहिती नसेल नाहीतर त्यांचेही नाव या बातमीत आलेच असते. सध्याची परिस्थिती पाहता कोरोनामुक्त करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक मिळून एकत्र काम करणे गरजेचे आहे. एकत्र काम करणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे.