पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ पसरली आहे. भांडणातुन एका तरुणावर कोयत्याने वार करत खून करण्यात आला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील , प्रवीण ज्योतीराम धुमाळ , राज तापकीर, अविनाश धनराज भंडारे , अजय भारत वाकोडे, मोरेश्वर रमेश आष्टे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शुभमचे वडील जनार्दन आत्माराम नखाते यांनी याप्रकरणी वाकड पोलीस फिर्याद दिली आहे.

शुभम जनार्दन नखाते असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेतील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील आणि अजय भारत वाकुडे यांचा तापकीर चौक येथे वडापावचा गाडा आहे. मयत शुभम आणि त्यांच्यात पूर्वीचे वाद होते.यामुळे आरोपींनी शुभमचा काधायचा ठरवला. मयत शुभम हा आरोपी ज्ञानेश्वर आणि अजयला वडापावच्या गाड्यावर येऊन नेहमी शिवीगाळ करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात पुन्हा वाद झाले होते. हे सर्व प्रकरण मिटवण्यासाठी राज तापकीर याने शुभमला फोन करून बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बोलावले होते, अस फिर्यादीत म्हटले आहे. शुभम दुचाकीवर तापकीर चौकातील धोंडिराज मंगल कार्यालयात आला. तेव्हा, त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि आरोपींनी शुभमवर कोयत्याने वार केले.

यानंतर शुभम रक्ताच्या थारोळ्यात पडला पडल्याने आरोपींनी घटनस्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांना काही तासांतच मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आली. यातील दोघेजण फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने करत करीत आहे

