पुणे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी सुशांत सिंह आत्महत्येच्या तपास शेवटी सीबीआय’कडे गेला. महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांचा जो वाद सुरू होता. त्याला शेवटी पूर्णविराम मिळाला. आणि ही केस सीबीआयकडे ट्रान्सफर करण्यात आली. सीबीआय तपासाच्या बातमीमुळे यांचे कुटुंबीय आणि त्याचे फॅन्स सोशल मीडिया वरून व्यक्त होताना दिसत आहे.

पार्थ पवारांनी देखील काही दिवसापूर्वी ट्विट केले होते, की सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे जायला हवा. त्यावेळी सुद्धा राजकीय वर्तुळात खूप मोठी खळबळ बसली होती. पार्थ पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र देखील बघायला मिळालं होतं. परत एकदा सुशांत सिंह आत्महत्येचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते अशी ट्विटरवर पोस्ट टाकल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ पसरली आहे.
