आठ दिवसापूर्वी झाला होता कोरोना.
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आठ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा अहवाल निगेटिव आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. परंतु सोमवारी अचानक रात्री उशिरा श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना एम्समध्ये मध्ये दाखल करण्यात आले.
अमित शहा यांना सोमवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास दिल्ली येथील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्यातरी त्यांना शरीरात थकवा आणि बॉडी पेन होत असल्याचा त्रास होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने लगेच कोरोना टेस्ट देखील करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव आली. सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर असून ते तिथूनच काम करीत आहे.
आठ दिवसांपूर्वी दिवसांपूर्वी अमित शहा कोरोना पॉझिटिव निघाल्यानंतर त्यांच्यावरती गुरुग्रामच्या मेदांता रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. कोरोना पूर्णतः बरा झाल्यानंतर ते घरी परतले होते. ही बातमी त्यांनी स्वतः शुक्रवारी ट्विट करून दिली होती.