केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 926 पोलिस पदकांची घोषणा,
दरवर्षीप्रमाणे यंदाही 74 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकाचे घोषणा करण्यात. यात सन्मानाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील 58 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला. 14 पोलिसांना शौर्य पदक जाहीर झाले. तर प्रशंसनीय सेवेसाठी 39 पोलिसाना पदके जाहीर झाली.

तसेच 5 पोलिस अधिकाऱ्यांची राष्ट्रपती पोलिस पदकासाठी निवड करण्यात आली. कोरोना काळात अतिशय कर्तव्यदक्षपणे पोलिसांनी कामगिरी पार पाडली आहे . यावेळी एकूण 926 पोलिस पदक जाहीर झाली आहेत. 80 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक तर 215 पोलिसांना शौर्य पदके मिळाली.


तर 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झाली आहेत. पोलिसांची उत्तम कामगिरी तसेच शौर्यासाठी पोलिस पदके दिली जातात. हा पोलिसांचा मान आणि सन्मान असतो.