संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना लसीचे संशोधन करण्यात रशियाने बाजी मारली. लस बाजारात आणून नागरिकांना देखील उपलब्ध करून दिली. सर्वात प्रथम फक्त फ्रन्टलाइन हेल्थ वर्कर यांना दिली जाणार आहे
दोन महिन्यानंतर इतर देशांनाही उपलब्ध करून देणार आहे. भारतातही 2 दोन महिन्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर मध्ये ही लस उपलब्ध होणार आहे. तसेच त्याचा डेटा देखील पुरवणार असल्याची माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिली. 11 ऑगस्टला सर्वात प्रथम राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या मुलीला ही लस देण्यात आली.
रशियानं केलेला दावा खरा ठरला परंतु या लसीचा डेटा रशियाने जाहीर केला नसल्याने संपूर्ण जगातून रशियावर टीका केली जात आहे. या लसची सत्यता जाणून घेण्यासाठी W.H.O मे देखील रशियाला चर्चेसाठी बोलावले आहे. लसीवर जरी टीका होत असली तरी ही लस जगातील कोरोनाची पहिलिच लस म्हणून ओळखली जाईल असा विश्वास पुतीन यांना आहे.
आतापर्यंत कोणत्याही देशाला लशीची अंतिम चाचणी करण्यात यश मिळाले नाही. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच रशियाची ही लस आशेचा किरण निर्माण करते. रशियन लसीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे.
एवढेच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतःच्या मुलीलाच लस देऊन विरोधकांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत कोणत्याही देशाला लशीची अंतिम चाचणी करण्यात यश आलेले नाही
.रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेने ही लस तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल. की जेणेकरून ती इतरही देशांना पुरवल्या जाईल.