भारत बायटेक व आयसीएमआरने बनवलेली covid-19 ची लस
संपूर्ण जगाला ग्रस्त करून सोडणाऱ्या कोरोना लसीवर राशीयांने बाजी मारली. नंतर ऑक्सफर्ड मधील सिरम इन्स्टिट्यूटची लस देखील येण्याच्या मार्गावर आहे. अशातच संपूर्ण भारतीय बनावटीची कोरोना लस भारत बायोटेकने बनवली आहे. या लसीचे नाव कोवॅक्सिन आहे. कोवॅक्सिनेही लसीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केला. यामुळे भारतीयांमध्ये आशेचे किरण निर्माण झाली. सध्या कोरोना लसीवर जगभर संशोधन सुरू आहे. तसेच बाजारात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे.
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनेही यशस्वीरित्या पहिलाटप्पा पूर्ण केला आहे. देशात १२ ठिकाणी ३७५ स्वयंसेवकांवर कोवॅक्सिनची चाचणी करण्यात आली. प्रत्येक स्वयंसेवकाला दोन डोस दिलेत. त्यांच्यावर या लसीचा कुठल्याही वाईट परिणाम झाला नाही. यासाठी या लसी बदल आशा वाढल्या आहेत.
सप्टेंबर महिन्यापासून या लसीच्या दुसरा टप्पा सुरू होणार आहे. ही लस भारत बायोटेक व आयसीएमआर कडून विकसित केल्या गेली. आयसीएमआरने पुण्याच्या संस्थेतील विलग केलेल्या करोना विषाणू पासून या लसीची निर्मिती केली.
ही भारताची पहिली लस आहे. भारत बायटेकने आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने ही लस विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच आता दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी भारतीय औषध नियामक संचालनालयाकडे परवानगीसाठी लवकरच अर्ज केला जाणार आहे. येणाऱ्या काळात दुसरा व तिसरा टप्पा यशस्वीरीत्या पार केला तरच पुढच्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात ही लस बाजारात येईल.