आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा सण
मध्यमवर्गीयांच्या घरांसाठी 25 हजार कोटी
स्वस्त इंटरनेट, स्वस्त स्मार्टफोन, परवडणारा हवाई प्रवास


नवी सायबर सुरक्षा धोरण तयार
प्रधानमंत्री आवास योजनते महिलांच्या नावाने घरे

दिल्ली : चिंतेची बाब असणाऱ्या कोरना विरोधात तीन लसीचे काम विविध टप्प्यात काम सुरू आहे. कोरणा योद्धांच्या मदतीने तीन कोटी भारतवासीयांना लवकर ही लस दिला जाईल. संशोधकांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही लस भारतातील नागरिकांना जलद गतीने देण्यात नियोजन केले आहे. अशी घोषणा 74 व्या स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहण भाषणाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी केली. नवी दिल्ली इथून लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून त्यांनी भाषण केले. नागरिकांकडे मजबूत भारताचे धोरण सांगितले.

यावेळी पीएम मोदी म्हणाले की भारतात कोरोना आला तेव्हा एकच कोरोना टेस्टिंग प्रयोगशाळा होती. परंतु आता चित्र बदलले आहे आता 1400 पेक्षा अधिक प्रयोगशाळा निर्माण झाल्या. 300 पासून 7 लाख कोरोना चाचणीपर्यंतचा टप्पा भारताने गाठला आहे. 5 वर्षात 35 हजार वैद्यकीय शिक्षणाच्या संधी तयार झाल्या. भारताला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्यासाठी मेक इन इंडिया सोबतच मेक फॉर वर्ल्ड मंत्रासह पुढे जावे लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. की जेणे करून आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकतो हा विश्वास त्यांनी जनतेमध्ये निर्माण केला.

जरी सर्वत्र कोरोनाच्या संकट होते तरी कोट्यावधी गरिबांना भारतीयांना मोफत गॅस पुरविण्यात आला. 90 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये गरिबांच्या खात्यात पोहचले. 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवण्यात आले.
शेतकरी आता स्वतः बाजारपेठेत त्याचा माल विकू शकणार आहे विकू शकणार आहे अशा संधी त्यांना उपलब्ध करून दिले आहेत. कोरोना काळात एक पाऊल पुढे टाकत आपण देशात एन-95, व्हेटिलेटर आणि अनेक गोष्टी तयार केल्या. यामुळे आपले दुसऱ्यावर वलंबून राहण्याच्या प्रवृत्तीला आळा बसत आत्मनिर्भर ते कडे वाटचाल करू लागलोत.
त्यामुळे आता भारतातील स्थानिक उत्पादनांना प्राधान्य येणार यात शंकाच नाही. परदेशी गुंतवणुकीने मागीलवर्षी सर्व रेकॉर्ड मोडले. जगभरातील कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. हे असंच झालेले नाही. यासाठी भारताने अनेक आमुलाग्र बदल केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातव्यांदा आज लालकिल्ल्यावर तिरंगा फडकवला. कोरोना प्रादुर्भावामुळे यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग या नव्हता, याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. मात्र त्यांच्या जागेवर कोरोनावर विजय मिळवलेले कोरोना योद्धे सहभागी झाले.
पारतंत्र्यापासून भारत कच्चा माल पाठवून तयार वस्तू चढ्या किमतीने विकत घेत होतो. परंतु आता भारताला आत्मनिर्भर करावं लागेल. यासाठी भारतात अनेक वस्तू निर्माण करण्याची पाऊल उचलण्यात सुरवात केली आहे पुढल्या वर्षी भारतीय स्वतंत्र भारताच्या 75 व्या वर्षीत प्रवेश करणार आहेत. यासाठी येणाऱ्या पुढील दोन वर्षांसाठी मोठे संकल्प केले आहेत की जेणे करून भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकेल.
110 लाख कोटी पेक्षा अधिकची आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद केली आहे. तसेच आता गावाकडून काम करण्यासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा मिळण्याची देखील योजना केलेली आहे. वस्तू तयार करणारा व्यक्ती भारतातील कुठल्याही भागात वस्तू न विकू शकतो यासाठी अनेक कायदे रद्द केले आहे.

राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत आजपासून, प्रत्येकाला ओळखपत्र मिळणार. यात आजार त्यावरील औषधे, डॉक्टरांनी केलेलं निदान ही सर्व माहिती एकाच कार्डवर उपलब्ध असणार हे नॅशनल हेल्थ कार्ड आपल्याला सर्वत्र उपयोगी पडणार आहे.
सुरुवात देखील पंतप्रधानांनी आजपासूनच केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर मधील लोकप्रतिनि सरपंच आमचे आभार मानले कारण त्यांनी तिथे विकासाला सुरुवात केली. आत्मनिर्भर भारत होण्यासाठी विविध मार्गाने मी प्रयत्न करीत आहे परंतु यासाठी पंतप्रधानांनी जनतेला मदत मागितली आहे. सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले तरच आपला भारत देश आत्मनिर्भर बनू शकेल असेही त्यांनी सांगितले