आता कुठे संजय दत्त आयुष्यात स्थिरावला होता, तेच कर्करोगाचे नवे संकट त्याच्यापुढे उभे राहिले. यावरही मात करणार असा विश्वास त्यांने व्यक्त केला आहे. थोडा ब्रेक घेऊन लवकर परतणार आहे असे ट्विट देखील त्याने करत चाहत्यांचे आभार मानले.

संजय दत्तची आई नर्गिस आणि पहिली पत्नी रीचालाही कॅन्सर होता

संजय दत्तचे जीवन प्रत्येकाने संजु या चित्रपटातून बघितले आहे. त्याने केलेल्या चुकांची शिक्षा भोगत संकटांवर मात करीत तो आज इथपर्यंत येऊन पोहोचला. त्याने कधीही हार मानली नाही. परिश्रम करत राहिला आणि जिंकत गेला.

त्यांच्या टीमने कर्करोगाच्या उपचारासाठी अमेरिका किंवा सिंगापूरलाचा विजा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. लवकरच कर्करोगाच्या उपचार घेण्यासाठी संजय दत्त परदेशात जाणार आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. अचानक संजय दत्तला देखील श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याने कोविड टेस्ट करून उपचारासाठी लीलावती रुग्णालय गाठले. परंतु त्याची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली. यामुळे त्याच्या इतर टेस्ट करण्यात आल्या. त्यावेळी फुप्फुसाचा कर्करोग निदान झाले. आणि कर्करोगाची चवथी स्टेज सुरू आहे. संजय दत्त डिस्चार्ज देण्यात आला. उपचारासाठी त्यांच्या टीमनवं आता पुढची पावले उचलण्यास सुरुवात केली. त्याने सडक टू चे पूर्ण डबिंग करून तो जाणार आहे. आणि त्याचा आजार स्वीकारला आहे मात्र त्याच्या दोन धुळा मुलांची चिंतेने ग्रासलाआहे

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »