इंदोर: अनेकांच्या मनावर राज्य करणारे शायर राहत इंदौरीं यांना कोरोंनाची लागण झाली. यातच त्यांना निमोनिया झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत गेली यातच त्यांना तीन हार्ट अटॅक आले. अखेर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते 70 वर्षांचे होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.
वयाचा विचार करता ते संसर्ग होऊ न देण्याची काळजी घेत होते. चार महिन्यांपासून फक्त केवळ रुटीन चेकअपसाठी बाहेर पडत होते. त्यांना चार-पाच दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यावर एक्सरे काढण्यात आला. त्यात निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांची स्वाबटेस्ट देखील पॉझिटिव आली. यातच त्यांना हृदयरोग आणि डायबिटीज देखील होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. तेथेच त्यांनी प्राण ज्योत मावळली. त्यांनी मुन्नाभाई एमबीबीएस आणि मर्डरसारख्या चित्रपटांमध्ये गाणी लिहली होती.