रियाच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला
मुंबई: सुशांचा केसमध्ये आज अनेक चढ-उतार आले. मुंबईत सुशांतने आत्महत्या केल्याने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनाकडे आहे. परंतु सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये गुन्हा नोंदवल्याने बिहार पोलीस मुंबईला येऊन सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करीत होते .परंतु मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य केले नाही. दोन्ही तपास वेग वेगळ्या दिशेने सुरू होते. यातच रियाने तपास मुंबई पोलिसांनी वर्ग करण्याची याचिका दाखल केली. तर सुशांतच्या कुटूंबीय व बिहार पोलिसांनी हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली. हे प्रकरण क्लिष्ट झालाने सुशांतला न्याय कधी मिळणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर न्यायालयाने तीनही वकिलांच्या सबबी ऐकून घेतल्या. तसेच त्यांचे मुद्दे 13 ऑगस्ट पर्यंत पर्यंत लेखी मागवले आहे. या सर्व प्रकरणावर 13 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
तर दुसरीकडे ईडीने चौकशीसाठी श्रुती मोदी, शोविक चक्रवती, रियाचे वडील इंद्रजीत चक्रवती , सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठानी, सुशांतची बहीण मितु सिंह यांना चौकशीसाठी बोलावले होते. रिया, तिचे वडील आणि भाऊ हे चौकशीला सहकार्य करत नसल्याने या तिघांचेही मोबाईल ईडीने जप्त केले. रियाच्या मोबाईल मधून महत्वाची माहिती मिळाली. आठ जून ला रिया आणि सुशांत मध्ये कुटुंबांच्या कारनावरून भांडण, मारामारी झाली. 8 जुनला रिया सुशातचे घर सोडून निघाली. त्यानंतर तिने दोन डायरेक्टरला फोन करून प्रसिद्ध जर्नलिस्टचा नंबर मिळवला. तिला आर्टिकल पब्लिश करण्याचे होते. आर्टिकल कोणते या संदर्भात माहिती मिळू शकली नाही.
सुशांत वडील केके सिंह यांनी मोदी व रिया चक्रवतीला मेसेज केले होते. हे मेसेज त्यांनी पाटण्यात चौकशीसाठी आलेल्या सीबीआयला दिले .त्यात त्यांनी असे म्हटले होते की तुम्ही सुशांतच्या संदर्भातली कुठल्या पूजा करत आहात. त्याची प्रकृती कशी आहे. याबद्दल मला माहिती हवी. तो माझा मुलगा आहे. त्यामुळे मला हे सगळं माहिती असायला हवे. परंतु यावर श्रुती मोदी व चक्रवर्तीने कुठलेही उत्तर सुशांतच्या वडिलांना दिले नाही.
सुशांत वडलांनी बिहारमध्ये केलेली एफ आय आर झिरो एफ आय आर म्हणून मुंबईकडे वर्ग करवी अशी याचिका चक्रवती ने केली होती. हे प्रकरण एकतर्फी आहे. यात राज्य मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करीत आहे, असा युक्तिवाद रियाच्या वकिलांनी कोर्टात केला. रिया चक्रवती काही दिवसापूर्वी सुशांत च्या केस मध्ये सीबीआय चौकशी मागत होती. तीच आता या केसचा तपास सीबीआय ,बिहार पोलिसांन ऐवजी मुंबईकडे वर्ग करावा असा युक्तिवाद करीत आहे. रियाने असादेखील आरोप लावला आहे की, बिहार मध्ये येणाऱ्या काळातील निवडणुकासाठी तेथील सरकारला या प्रकरणाचा फायदा करून घ्यायचा आहे. तपास करण्याचा अधिकार बिहार पोलिसांना नसतानादेखील त्यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात उडी घेतली. परंतु या सर्व बाबीला सुशांत वडील केके सिंह यांनी अतिशय भावनिक पद्धतीने उत्तर देतांना सांगितले, माझ्या चितेला आग देण्यासाठी सुशांत असता तर तो पाटण्याला आला असता. त्यामुळे आता प्रत्येकजण समजू शकला असता की त्याचे व पाटणा म्हणजेच बिहारचे काय संबंध आहे . तसेच आज पहिल्यांदाच केके सिंहांनी सुशांच्या गळ्यावरील आवळन्याचे निशांन दोरीचे नसून बेल्टचे असल्याची शक्यता वर्तवली. तसेच माझी मुलगी त्यादिवशी सुशांतच्या घरी पोहोचली तेव्हा सुशांतला बेडवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे तिनेही सुशांतला फासावर लटकलेले बघितले नाही. यासाठी ही आत्महत्या नसून खून असल्याची शंका व्यक्त केली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास नि: पक्ष पणे होण्यासाठी सीबीआयकडे जाण्याची गरज आहे. या सर्व बाबींवर विचार करून न्यायालय 13 ऑगस्टला सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास कुणाकडे यावर शिक्कामोर्तब करेल.