मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची 9 तास ईडीने चौकशी केली. मात्र या चौकशीत रियाने प्रतिसाद दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे सोमवारी परत रियाची चौकशी परत होऊ शकते.
सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी ईडीने ( प्रवर्तन निदेशालय ) रिया चक्रवती वर मनी लाँडरिगचा गुन्हा दाखल केला. कारण बिहार पोलिसांचा तपासात रियाने सुशांतिच्या पैशाची याने अफरातफर केल्याचे समोर आले होते. करोडो रुपयाची हेराफेरी असल्याने रिया चक्रवर्तीला 7 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र रियाने वकिलांमार्फत चौकशी साठी उपस्थित राहू शकत नाही असा मेसेज केला होता. परंतु पोलिसांनी तिची रिक्वेस्ट फेटाळून लावून चौकशी उपस्थित राहण्यासाठी सांगितले. सुशांत सिंह च्या क्रिएटिव डायरेक्टर सिद्धार्थ पीठानी, पूर्व मॅनेजर श्रुती मोदी आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती या तिघांची देखील चौकशी करणार आहे .यातून रियाने सुशांतच्या किती पैशांची हेराफेरी केली याची माहिती मिळण्यास ईडीला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची ऐकत आहे.
रिया पोलिसांच्या चौकशीतुम पळत काढत होती. परंतु ईडी कडे चौकशीसाठी उपस्थित राहण्या शिवाय रियाकडे पर्यायच उरलाच नव्हता. ती चौकशीस उपस्थित राहिली नसती तर तिला अटक केली असती. हे तिला माहिती होते,यासाठी ती चौकशीसाठी उपस्थित राहिली. परंतु चौकशीदरम्यान सुरुवातीला तिने काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र ईडीने रियाला बोलण्यास मजबूर केले. रियाने तिच्यावर मनी लाँडरिगचे लागलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे देताना ती आठवत नसल्याचे देखील म्हणाली. काही गोष्टी तर विसमरणात गेल्याचेही ती म्हणाली.

रियाचं वार्षिक उत्पन्न 14 लाख रुपये आहे . तरी तिने आलिशान सोसायटीमध्ये मुंबईमध्ये दोन घरे बुक केली. आणि त्या दोन्ही घरांना होम लोन देखील मिळाले असल्याची आश्चर्य कारक बाब देखील पुढे आली. यासाठी तिच्यावरील संशय अधिक दाट होतो. कोणत्याही प्रश्नाचे रिया समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. तसेच सुशांत कडून किती पैसे घेतले किंवा त्याच्या अकाउंट मध्ये किती रक्कम ट्रान्सफर झाली. याबद्दल काहीच बोलली नाही. तसेच सुशांतच्या कुटुंबात इतर सदस्य असताना सुशांतने शोविक पाटनर का करून घेतले याबाबतही तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. ती म्हणाली सुशांत आणि एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे त्यांच्यात विश्वास होता. त्यामुळे सुशांतला त्याच्या कंपनीत पार्टनर करून घेतले होते.



या सुशांतच्या निर्णयात मी कुठे नव्हती हा निर्णय पूर्णतः सुशांतचा होता. रियाच्या उत्तरण बाबत कोणतेही ठोस पुरावे अद्याप तरी मिळालेले नाही. यामुळे ति चौकशीच्या फेऱ्यात चांगलीच अडकली असल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर परत या केसला वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे .कारण या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय करणाऱ्यावर यावर सोमवारी शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबत अशी चर्चा सुरू आहे की हा तपास मुंबई पोलिसांकडे केला तर मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सहकार्य केले नाही.
तसेच तसेच ईडीला देखील सहकार्य करणार नाहीत. यामुळे आता हा तपास कुठल्या वळणावर जातो हे सोमवारीच कळू शकेल. तसेच रियाने शनिवारी वकिलांमार्फत सुशांतची तिला दिलेली छिछोरे चित्रपटाचे नाव असलेली पाण्याची बॉटल आणि एका डायरीच्या पेजवर सुशांतनी रिया च्या आई वडिलांचे मानलेले आभार या दोन्ही बाबीवर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून या दोनच सपर्ति माझ्याकडे असल्याचे रियाने सांगितले
